26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंची तोफ आता पुण्यात धडाडणार

राज ठाकरेंची तोफ आता पुण्यात धडाडणार

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या आणि भोंग्याच्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची पुढील सभा पुण्यात होणार आहे. सर परशुराम महाविद्यालयाच्या (एस पी कॉलेज) मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच होणा-या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतच राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुढील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. २१ ते २८ मे च्या दरम्यान ही सभा पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या