27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराज ठाकरे यांचा थेट इशारा : योगी आदित्यनाथ, मग तुम्हीही लक्षात ठेवा!

राज ठाकरे यांचा थेट इशारा : योगी आदित्यनाथ, मग तुम्हीही लक्षात ठेवा!

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना आत येता येणार नाही, हे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचं असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असं योगी म्हणाले होते.

‘उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील, तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल, असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल, तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हेही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं.’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ‘तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे. तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा, हा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा’ अशी सूचनाही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला केली.

Read More आमच्या येथून झालेली नाही कोरोनाची उत्पत्ती – वुहान लॅब

उत्तर प्रदेशातील कामगारांचा शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, असे उद्गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले होते. महाराष्ट्र सरकारने ‘सावत्र आई’ म्हणून तरी काळजी घ्यायला हवी होती, असा टोला योगींनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला होता.

राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. त्यावेळीही राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती.’परप्रांतीय कामगारांना परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. कारण त्या राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याच वेळी त्यांची ‘राज्य स्थलांतरित कायद्या’खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो.’ असं राज ठाकरे म्हणाले होते.

इथून पुढे कोणतेही राज्य परवानगीविना उत्तर प्रदेशच्या मजुरांना घेऊ शकत नाही : आदित्यनाथ

उत्तर प्रदेश व इतर राज्यातील कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच ‘प्रवासी आयोग’ (स्थलांतर आयोग) स्थापन करण्यात येणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी म्हणाले की याअंतर्गत उत्तर प्रदेशमधील सर्व कामगार व कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक सुरक्षेचीही हमी दिली जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले, “उत्तर प्रदेशात आपल्याकडे आलेले सर्व मनुष्यबळ. राज्य सरकार त्यांच्या कौशल्यांबद्दल माहिती गोळा करीत आहे. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशात रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पुढे केली जाईल.” ते म्हणाले, ‘अशा परिस्थितीत एखाद्या राज्याला कामगारांची गरज भासल्यास, त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकार सामाजिक सुरक्षेची हमी देईल, विमा प्रदान करेल आणि कामगार आणि कामगारांना सर्व प्रकारचे संरक्षण देईल. याद्वारे कोणतेही राज्य सरकार परवानगीशिवाय उत्तर प्रदेशातील लोकांना कामगार व कामगार म्हणून घेणार नाही.

मुख्यमंत्री म्हणाले, “लॉकडाऊन दरम्यान उत्तरप्रदेशातील स्थलांतरित कामगारांना ज्या प्रकारे त्रास झाला आणि त्यांच्याबरोबर ज्या प्रकारचे गैरवर्तन झाले त्या पाहता त्यांच्या सामाजिक सुरक्षेची हमी राज्य सरकार घेणार आहे. योगी म्हणाले की, उत्तर प्रदेश वगळता देशात आणि जगात जेथे जेथे जाईल तेथे प्रवासी कामगारांच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या