27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाराजस्थानची फायनलमध्ये धडक

राजस्थानची फायनलमध्ये धडक

एकमत ऑनलाईन

उद्या होणार गुजरात टायटन्ससोबत अंतिम लढत
अहमदाबाद : जोस बटलरची शतकी (१०६) खेळी आणि प्रसिद्ध कृष्णा-अबोद मकॉय यांच्या भेदक मा-याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ७ गड्यांनी विजय मिळवला. या पराभवासह आरसीबीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. राजस्थान रॉयल्सने २००८ नंतर आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली. आता २९ मे रोजी राजस्थानचा सामना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सविरोधात होणार आहे.

१५८ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचे सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर यांनी वादळी सुरुवात केली. दोघांनी ५ षटकात ६१ धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वालने १३ चेंडूत २१ धावांची खेळी केली. त्यानंतर संजू सॅमसनने २१ चेंडूत २३ धावांची छोटेखानी खेळी केली. पडिक्कलला मोठी खेळी करण्यात अपयश आले. जोस बटलरने एका बाजूला पाय रोवत फलंदाजी केली. त्याने आरसीबीच्या सर्व गोलंदाजांची धुलाई केली आणि बटलरने राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये पोहोचवले आहे.

बटलरचे चौथे शतक
जोस बटलरने यंदाच्या हंगामातील चौथे शतक झळकावले. बटलरने ५९ चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीने एकाच हंगामात ४ शतके झळकावण्याचा विक्रम केला. जोस बटलर यंदाच्या हंगामात ८०० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या