परभणी : ठाकरे गटाच्या फायरब्रँड म्हणून ओळखल्या जाणा-या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अभिनेत्री राखी सावंतची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी केली आहे. दोघीही गायन, मॉडलिंग क्षेत्राशी निगडित आहेत आणि दोघींचीही प्लास्टिक सर्जरी झालेली आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले आहे.
परभणीतल्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान बोलताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केले आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची तुलना केली. राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी नाही, असे म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या तुलनेचा अंधारेंनी समाचार घेतला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच भाजपचे अनेकजण माझ्यावर कुठल्याही स्तराला जाऊन हल्ला करत आहेत. माझ्या स्त्रीपणावर घाला घातला जातोय, पण मी चळवळीचं शास्त्र शिकून आले आहे. मी हार मानणार नाही, असे अंधारे म्हणाल्या..