22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रआ. राम सातपुते बालंबाल बचावले

आ. राम सातपुते बालंबाल बचावले

एकमत ऑनलाईन

गाडीचे ३ टायर फुटल्याने अपघात, कुठलीही इजा नाही
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला. गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून राम सातपुते थोडक्यात बचावले आहे. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

भाजपचे आमदार राम सातपुते आज दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी आपले कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले. यावेळी सातपुते सोबत होते. त्यानंतर परतत असताना माळशिरस तालुक्यात आले असताना अचानक गाडीचे टायर फुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला आली. पण या अपघातातून राम साातपुते थोडक्यात बचावले आहे. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

राम सातपुते यांनी फेसबुकवर व्हीडीओ लाईव्ह करून आपण सुखरूप असल्याचे सांगितले. आज मतदार संघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला. यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले. परंतु जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने मला व माझ्या सोबत असणा-या माझ्या सहका-यांना कुठल्याही प्रकारची इजा अथवा काहीही दुखापत झाली नाही, असे सातपुते यांनी सांगितले.

राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला, याची माहिती वा-यासारखी पसरली. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून विचारणाही केली. मात्र, गाडीचे तीन टायर फुटूनसुद्धा आपल्याला कोणतीही इजा झाली नाही, काळजी करू नका, मी ठीक आहे, असे आवाहनही राम सातपुते यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या