25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्ररामदास कदमांचा मुलगा अजूनही शिवसेनेतच

रामदास कदमांचा मुलगा अजूनही शिवसेनेतच

एकमत ऑनलाईन

मुंबई :सत्तासंघर्षानंतर शिवसेना-शिंदे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. अशातच, राजकीय वर्तुळात रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदमची चर्चा जोरदार सुरू आहे. रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे देखील शिंदे गटात गेले आहेत. मात्र त्यांचा दुसरा मुलगा सिद्धेश अजूनही शिवसेनेतच आहे.

त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र रामदास कदम यांचे दुसरे पुत्र ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत आहे. त्यामुळे त्यांना कार्यकारिणीत अजूनही स्थान कसे काय?असा सवाल उपस्थित होत आहे.

शिवसेना ठाकरे गटाची काल शिवसेना भवनात दसरा मेळावा पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभागप्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारिणीत कसे? असा प्रश्न विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला.

तसेच, शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्त करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारला? यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या