23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्ररामदास कदम यांची जीभ घसरली

रामदास कदम यांची जीभ घसरली

एकमत ऑनलाईन

गद्दारी तुमचीच, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका
दापोली : शिवसेना कोकणी माणसाने मोठी केली. आजची सभा बाळासाहेब ठाकरे बघत असतील आणि म्हणत असतील की, माझा मुलगा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे बिघडला आहे, अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना टुनटुन करत खोके खोके बोलत आहेत, आधी लग्न करून बघा मग संसार काय असतो ते कळेल. त्यावेळी खोके काय ते कळेल, असा टोला त्यांनी लगावला, तर आ. भास्कर जाधव यांना तर थेट शिवीच घातली. यावेळी त्यांची जीभ चांगलीच घसरल्याचे पाहायला मिळाले.

रामदास कदम आज दापोलीत बोलत होते. राष्ट्रवादीसोबत संसार मांडू नका, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जावू नका असे बोललो होतो. त्यावेळी मातोश्रीवरून निघून आलो. त्यामुळे भविष्यात मातोश्रीची पायरी कधी चढणार नाही. एक दिवस आधी बैठक झाली, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवून मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले होते, असे रामदास कदम म्हणाले. दापोलीतील शिवाजी महाराज यांचा पुतळा योगेशने बसवला. एकावेळी ९० विकास कामे नगरपरिषदेत सुरू केली होती. विकासाला किंमत नाही का? अजित पवार यांनी पाठवलेल्या खोक्याला किंमत नाही का? आदित्य खोके खोके, गद्दार म्हणत आहेत, परंतु आदित्य गद्दार तुम्हीच आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर रामदास कदम यांना कसे संपवायचा याचा कार्यक्रम सुरु होता, असा आरोप त्यांनी केला.

पर्यावरण खाते मला संपवण्यासाठी दिले, त्यांना वाटले मला काही कळणार नाही. प्लॅस्टिक बंदीचा कायदा केला. त्यावेळी आदित्य आपण केला, आपण केला असे सांगत होते. दोन वर्ष माझ्या शासकीय बैठकांत अधिकार नसतानादेखील ढवळाढवळ करत असत. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री. एखाद्याला संपवून टाकायचे. गद्दारी याला म्हणतात. मला आश्चर्य वाटते की रश्मी ठाकरे कशा नाहीत, उद्धव ठाकरे जातील, तिथे रश्मी ठाकरे असतात. मासाहेब कधीच व्यासपीठावर चढल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही. मातोश्रीवरदेखील खोके गेलेत, तोंड उघडायला लावाल तर भूकंप होईल. यांनी एवढे खोके खाल्ले, यांना डायबेटीस कसा होत नाही. ५० आमदार कसे जातात, उद्धवजी आम्हाला भेटत नव्हते. अजित पवारांकडून आमच्यावर अन्याय झाला. आमदार ओक्साबोक्सी रडत होते. राष्ट्रवादीला ५७ टक्के काँग्रेसला ३३ टक्के आणि शिवसेनेला १६ टक्के निधी मिळायचा. मुख्यमंत्री शिवसेनेचा,पण उद्धव ठाकरे काय करायचे? आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचे खाते चालवत होते. आम्ही जेलमध्ये गेलो, तुम्ही काय भीक दिली का? शिवसेना प्रमुखांची शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. मंत्रालययात किती वेळा गेलात? महाराष्ट्राशी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, तुम्ही स्वत:चा स्वार्थ पाहिलात, अशी टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.
,

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या