28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्ररामराजे निंबाळकरांनी माझ्याविरोधात लोकसभेला उभे रहावे; खासदार रणजितसिंह निंबाळकर

रामराजे निंबाळकरांनी माझ्याविरोधात लोकसभेला उभे रहावे; खासदार रणजितसिंह निंबाळकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांना आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभेत उभे राहून दाखवा, असे आव्हान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे यांना दिले आहे.

भाजपचे खासदार रणजित सिंह ंिनबाळकर हे सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणा-या माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात. २०१९च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांचा पराभव करून माढ्यात कमळ फुलवले होते.

रामराजेंना आव्हान देताना रणजितसिंह निंबाळकर म्हणालेत की, ‘ भाजप तर सोडा यांना राष्ट्रवादीही परत तिकीट देणार की नाही याची शंका आहे. कारण यांच्यावर विश्वासच राहिला नाही. फलटणची विधानसभा राखीव आहे. त्यांच्यातील पिल्लावळ बोलत असते. मी तर आजच जाहीर सांगतो, ज्याला कुणाला खूमखूमी आहे. त्यांनी माझ्याविरोधात लोकसभा लढवा. नाही तर माण तालुक्यात जाऊन विधानसभा लढवा. बघू किस में कितना है दम. आजच सांगतो, आणि जाहीर आव्हान देतो. या माझ्याविरोधात लढा’
रामराजे निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या