मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. रणबीर कपूरने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचे चाहते नेहमी त्याच्याबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. रणबीरने एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
रणबीर कपूरने एका मुलाखती दरम्यान सांगितले की ‘ए दिल है मुश्किल’ च्या सेटवर जेव्हा त्याचा आणि ऐश्वर्या रायचा रोमँटिक सीन शूट होत होता तेव्हा परिस्थिती अवघड होऊन बसली होती. रणबीरचे हात थरथरत होते, तो खूपच नर्व्हस होता. त्याला लाज वाटत होती. ज्यानंतर ऐश्वर्याने त्याला समजावले की हा फक्त अभिनय आहे, यात चुकीचे काही नाही. पुढे रणबीरने सांगितले, ऐश्वर्याने असे म्हणताच मी विचार केला की असा चान्स परत मिळणार नाही. कदाचित हा माझा शेवटचा चान्स असू शकतो. त्यानंतर त्याने तो सीन चांगल्या प्रकारे केला.