22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeबीडमठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल ;बीडमध्ये खळबळ

मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल ;बीडमध्ये खळबळ

एकमत ऑनलाईन

बीड : बीड जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. बीडच्या हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या महाराजांचे पूर्ण नाव बुवासाहेब जिजाबा खाडे असे आहे.

लग्नाचे आमीष दाखवून त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून खाडे महाराज यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यात आला असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत. जून २०२२ ते जुलै २०२२ या काळात बलात्कार करण्यात आला, असा सनसनाटी आरोप पीडितेने खाडे यांच्यावर केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.

या तक्रारीमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे खाडे यांनीही आपल्याला मारहाण झाली असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. मारहाण करून आपल्याकडील सोन्याचा ऐवज लुटण्यात आल्याचा दावा खाडे यांनी तक्रारीत केला आहे. त्यानुसार पाच संशयितांविरोधात खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संमतीशिवाय लैंगिक संबंध..?
पीडित महिलेने आपल्या तक्रारीत, खाडे यांनी संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप केला आहे. लग्न करण्याचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खाडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

कोण आहेत खाडे महाराज?
बुवासाहेब जिजाबा खाडे हे हनुमानगड येथील मठाधिपती म्हणून ओळखले जातात. हनुमानगड हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात येतो. जामखेड येथे खाडे महाराज यांचे अनेक भक्तगण असल्याचेही सांगितले जाते. खाडे महाराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

खाडे महाराजांकडूनही पोलिसांत तक्रार
दरम्यान, आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि लुटल्याप्रकरणी खाडे यांनी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोन्याची चेन, अंगठी, मणी अशी एकूण १३ लाख ६० हजार रुपयांची लूट झाली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार जामखेड तालुक्यातील मोहरीमध्ये राहणा-या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बाजीराव गिते, भिवा गोपाळघरे, अरुण गिते, राहुल गिते, रामा गिते यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या