22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रपंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्वदूर सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख १५ धरणे यापूर्वीच भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास मोसमात तिस-यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांपासून नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

दुपारी १२ वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार राजाराम बंधा-यावर पंचगंगेची पाणी पातळी २६ फूट ८ इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.

राधानगरी धरणाचा ६ व्या क्रमांकाचा दरवाजा बंद
पावसाने थैमान सुरु असल्याने काल राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे काही तासांमध्ये उघडले होते. दरम्यान, आज सकाळी ६ व्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला आहे. सध्या राधानगरी धरणाचा ४ व ५ वा दरवाजा खुला आहे. धरणातून भोगावती नदी पात्रात ४ हजार ४५६ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ बंधारे पाण्याखाली
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने जिल्ह्यातील ३६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अलमट्टी धरणातून विसर्ग कायम
पावसाचा जोर वाढल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून ५२ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातून विसर्ग सध्या बंद आहे. दुसरीकडे कोयना धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणात ३ हजार ७६क्युसेकने आवक सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणातून १ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या