20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रबलात्का-यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

बलात्का-यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

एकमत ऑनलाईन

बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील साकीनाकामध्ये झालेल्या घटनेनंतर डोंबिवली, सातारा, कल्याण येथूनही लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या घटनांवर संताप व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

‘आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे. माझ्या पहिल्या भाषणापासून मी महिला अत्याचारावर भाष्य करत आहे. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढावे, त्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचे जे चित्र आहे ते थोडेसे विदारक दिसत आहे,’’ असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

‘या घटनांनंतर संताप व्यक्त केला जातो पण खरे काम पोलिसांचे आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तात्काळ राबवल्या पाहिजेत जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणाची महिलेला स्पर्श करण्याची, त्रास देण्याची आणि वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे,’’ असेही यावेळी त्यांनी म्हटले.

करुणा शर्मा प्रकरणावर ट्विट करताना पंकजा मुंडे यांनी चुकीच्या लोकांच्या हातात ताकद असल्याचा उल्लेख केला होता. यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटले की, ‘‘जेव्हा आपण राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडलो जातो, आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्याने व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आत्ताचे राजकारण सभ्य म्हणायला नकोसे वाटते’.

‘राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन फारसा सकारात्मक नाही. त्यात आपण राजकीय संस्कृतीचे ट्रेंड जे निर्माण होत आहेत ते भविष्यासाठी फारसे चांगले नाहीत,’ असे पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या