28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्ररश्मी ठाकरे ‘वर्षा’वर कंत्राटदारांना भेटायच्या; रामदास कदम यांचा गौप्यस्फोट

रश्मी ठाकरे ‘वर्षा’वर कंत्राटदारांना भेटायच्या; रामदास कदम यांचा गौप्यस्फोट

एकमत ऑनलाईन

मुंबई : दापोलीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्याच. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत.

तर इतरवेळी ते ‘मातोश्री’वर लपून बसून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप शिंदे गटातील आमदार रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.

पुढे बोलताना कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा भरत गोगावले यांना मंत्रिपद दिलं असतं. पण वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेचच कॅबिनेट मंत्री व्हायचे होते. एवढेच कशाला, तर रश्मी ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात कसा समावेश झाला नाही, याचे मला आश्चर्य वाटते, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या