25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणासह इतर मागण्यांवरून राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

ओबीसी आरक्षणासह इतर मागण्यांवरून राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासह विविध मागण्यांच्या मुद्यांवरून राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झाला आहे. या मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या ५ ऑगस्टला दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. संसदेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

विविध मुद्यांवरून राष्ट्रीय समाज पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विविध मागण्यांसाठी ५ ऑगस्टला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार आहे. जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करणे, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात संपूर्ण देशातून लोक सहभागी होणार आहेत.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी बारामतीमधून देखील मोठ्या प्रमाणावर लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या