24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहागाई कमी होणार!

महागाई कमी होणार!

एकमत ऑनलाईन

मुंबई : महागाई नियंत्रणासाठी सरकारने केलेल्या उपयायोजनानंतर खाद्य तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. सूर्यफूल, सोयाबीन, मोहरीचे तेल लिटरमागे १० ते १५ रुपयांनी स्वस्त झाले असल्याचा दावा केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिका-याने केला.

केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार किरकोळ बाजारात खाद्य तेलाचा भाव १५० ते १९० रुपये प्रती लिटर या दरम्यान आहे. प्रमुख खाद्य तेल उत्पादक अदानी विल्मर आणि मदर डेअरी या कंपन्यांनी विविध प्रकारच्या खाद्य तेलाच्या किमतीत प्रती लीटर १० ते १५ रुपयांची कपात केली आहे. नव्या छापील किमतीचा माल किरकोळ बाजारात दाखल होईल, असे मत केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले.

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार २१ जून २०२२ अखेर शेंगदाणा तेलाचा एक लिटरचा भाव १८८.१४ रुपये आहे. १ जून २०२२ रोजी तो १८६.४३ रुपये होता. मोहरी तेलाचा भाव १८०. ८५ रुपये आहे. १ जून २०२२ रोजी तो १८३.६८ रुपये होता.

पाम तेलाचा भाव देखील कमी झाला आहे. एक किलो पाम तेलाचा भाव १५२.५२ रुपये असून १ जून २०२२ रोजी तो १५६.४० रुपये इतका होता. सोयाबीन तेलाचा २१ जून २०२२ रोजीचा भाव १६७.६७ रुपये असून १ जून २०२२ रोजी तो १६९.६५ रुपये होता. दरम्यान नव्या किमतींनुसार किरकोळ बाजारात तेल आणखी १० ते १५ रुपयांनी स्वस्त होणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षभर खाद्य तेलाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. रशिया-युक्रेन युद्ध, मलेशियाकडून पाम तेल निर्यातीवर निर्बंध यासारख्या कारणांमुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र मागील आठवडाभरात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाचे भाव कमी झाले. त्याशिवाय भारताला अर्जेंटिना आणि रशियाकडून खाद्य तेलाचा पुरवठा वाढला आहे. या दोन्ही देशांमधून सूर्यफूल तेलाचा जादा पुरवठा होत आहे. ज्यामुळे तेलाचे भाव कमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या