24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रराठोड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर दबाव आणत मंत्रिपद मिळवले?

राठोड यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर दबाव आणत मंत्रिपद मिळवले?

एकमत ऑनलाईन

मुंबई :आपल्याला पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशीत क्लीन चिट मिळाल्याचा दावा करत संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर दबाव आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या महिन्याभरापासून खोळंबलेला विस्तार अखेर काल पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजपा आणि शिंदे गटातल्या प्रत्येकी ९ मंत्र्यांचे शपथविधी झाले. मात्र यात शिंदे गटात मतमतांतरे, वाद पाहायला मिळाले. मुख्यमंत्री शिंदेंना अनेकांची नाराजीही ओढवून घ्यावी लागली.

पहिल्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारात काल संजय राठोड यांनीही शपथ घेतली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. हे प्रकरण भाजपाने चांगलेच लावून धरले होते. मात्र आता भाजपासोबतच्या सत्तेत त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्याने त्यावरून टीका होत आहे.

समर्थक आमदारांच्या दबावतंत्रामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्याने राठोड यांना मंत्रिपद नाकारण्यात आले होते. मात्र संजय राठोड यांनी एकनाथ शिंदेंकडे आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्यावर दबाव टाकला आणि मंत्रिमंडळ विस्तार यादीत नाव टाकून घेतले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या