27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्र  राऊतांनी  ​ईडीला घाबरून आमच्याकडे, भाजपत येऊ नये

  राऊतांनी  ​ईडीला घाबरून आमच्याकडे, भाजपत येऊ नये

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : संजय राऊत यांनीच सांगितले की, मी काहीच केले नाही ज्याला कर नाही त्याला डर कशाला? ​​​​​ईडीच्या कारवाईच्या भितीने आमच्याकडे कुणी येत असेल, तर त्यांनी आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नये. कुणीही दडपण आणि भीतीखाली पुण्याचे काम करु नका. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबादेत लगावला. ते आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ज्या केंद्रीय तपासयंत्रणांनी यापूर्वीही कारवाया केल्या. त्याही आपण तपासून घ्यावा. सुडाच्या कारवाईच्या आवश्यकता काय? आम्ही एक तरी सुडाची कारवाई केली का? जे शिवसेनेतून आमच्याकडे आले, त्यातील एकाही आमदाराने ईडीच्या कारवाईबाबत अथवा सुडाबद्दल काहीच म्हटले नाही.

चौकशी होऊ द्या मग बोलू
मुख्यमंत्री म्हणाले, संजय राऊत यांची ईडी चौकशी सुरु आहे. तेच म्हणाले, मी काही केले नाही. मग ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला..चौकशी होऊ द्या त्यातून पुढे काय येईल ते कळेलच. मविआचे ते मोठे नेते होते. दरदिवशी ते पत्रकार परिषद घेत होते.

शेतक-यांना वा-यावर सोडणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आम्ही आज अतिवृष्टीचा आढावा घेतला, काही जणांचे पावसामुळे मृत्यू झाले, त्यांच्या मदतीचा आढावा घेतला. शेतपीकांचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देऊ, शेतक-यांना हे नविन शिवसेना भाजप युतीचे सरकार वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ. औरंगाबादला पाण्याचा पूरवठा नियमित व्हावा, यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

सर्वांना पाणी मिळावे म्हणून प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नुकसानग्रस्ताना मदत करणार असून सर्वांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे्. औरंगाबादलउा क्रीडा विद्यापीक स्थापन करणार, आत्महत्या होणार नाही यासाठी प्रयत्नच नव्हे तर नियोजन करावे लागेल.

कराड यांच्यासोबत बैठक घेणार

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्रीय मंत्री भागवत कराड हे बँकेसोबत बैठका घेणार आहेत. आजही एक बैठक झाली, यात अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. वेरुळच्या विकासासाठी निधी देणार असून मराठावाड्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आजची बैठक होती.

सर्व सामान्यांचे सरकार आहे, सर्व घटकांना आमचे सरकार मदत करणार आहे. केंद्र सरकारची आपल्या सरकारला मोठी मदत मिळणार आहे. पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिले की, निधी पडू देणार नाही. योजनांना चालना देणार असून केंद्राचा निधी योग्य वापरु, रेल्वेचा प्रश्नही मांडण्यात आला त्यावर आम्ही लक्षकेंद्रीत करू.

फोकस प्रोजेक्ट राबवणार

मुख्यमंत्री म्हणाले, रस्त्याचा प्रश्न असून शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी गुणवत्तापूर्ण कामे करणार आहोत. जवळपास सहाशे किलोमिटरच्या रस्त्यांचे काम सुरु होणार असून सात हजार कोटी रुपये खर्च आहे. मुंबईत शंभर टक्के रस्ते सिमेंट – काँकीटचे काम होणार आहे. तसेच रस्ते राज्यात होतील. कामे गुणवत्तापूर्ण होतील कुणालाही पाठीशी घालणार नाही. शेतक-यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी राज्यसरकार कटीबद्ध आहे.

परभणीत समांतर पाणी योजना
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, परभणी मध्ये समांतर पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. तसेच नांदेड ते जालना समृद्धी महामार्ग देखील करायचा आहे. मराठवाड्यात मंत्री मंडळ बैठक प्रथा खंडित झाली आहे. याबाबत विचारले असता मंत्रिमंडळ बैठकीचा विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद पाणी पुरवठा योजना मंजूर
औरंगाबाद पाणी पुरवठा योजना बाबत १९३ कोटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.मुंबई मधून त्यामध्ये त्रुटी काढण्यात आला होता.त्याला आता मजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे ७५ एम एल डी पाणी मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या