23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्रीडा  रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह

  रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला कोरोनाची लागण झाली आहे. अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याने अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौ-यावर जाऊ शकला नाही.

टीम इंडिया १ जुलैपासून एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविचंद्रन अश्विन कोरोना प्रोटोकॉलचे सर्व नियम पूर्ण केल्यानंतरच इंग्लंडला रवाना होईल. खरेतर, अश्विन संघासह यूकेला रवाना होणार होता. मात्र, तत्पूर्वी, त्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली.

सध्या तो क्वारंटाईनमध्ये आहे.
चेतेश्वर पुजारा, विराट कोहलीसह अनेक खेळाडू १६ जून रोजी इंग्लंडला रवाना झाले होते, तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एका दिवसानंतर इंग्लंडमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर सोमवारी (२० जून) पहाटे इंग्लंडला रवाना झाले.

आर. अश्विन शुक्रवारपासून खेळल्या जाणा-या लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकणार आहे. मात्र, तो पहिल्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. टीम इंडिया गेल्या वर्षी इंग्लंडच्या दौ-यावर गेली होती, त्यावेळी भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार होता, मात्र त्यानंतर मालिकेतील केवळ ४ कसोटी सामने खेळले गेले. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या