पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी प्रचार संपल्यानंतरही थांबायला तयार नाहीत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रवींद्र धंगेकर हे आज सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी हे उपोषण मागे घेतले आहे.
भाजपचे नेते आणि पदाधिकारी हे पोलिसांच्या उपस्थितीत कसब्यातील मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले होते. धंगेकरांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती.