16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयआरबीआय लाँच केला डिजिटल रुपया; पथदर्शी प्रकल्पासाठी ९ बँकांची निवड

आरबीआय लाँच केला डिजिटल रुपया; पथदर्शी प्रकल्पासाठी ९ बँकांची निवड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : क्रिप्टो करंसीचे वाढते प्रस्थ आणि त्यातल्या फसवणूकीची जोखीम लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी डिजीटल रुपयाचा पथदर्शी प्रकल्प लॉँच केला.

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच डिजिटल चलनाचा उल्लेख केला होता. डिजिटल रुपया चालू आर्थिक वर्षात सुरू केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. यानंतर रिझर्व्ह बँकेनं त्याची ब्लू प्रिंट तयार केली. या डिजिटल रुपी अर्थात डिजिटल करंसीमुळे सरकारी सिक्युरिटीजच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम डिजिटल रुपी म्हणून वापरली जाणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं ७ ऑक्टोबरला सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर एक कॉन्सेप्ट नोट सादर केली होती. ज्यामध्ये लवकरच डिजिटल रुपी लॉन्च करण्याबाबत उल्लेख केला होता.

मोठ्या रकमेचे पेमेंट डिजिटल
डिजिटल रुपी पथदर्शी प्रकल्पासाठी रिझर्व्ह बँकेने देशातील ९ बँकांची निवड केली आहे. या डिजिटल रुपीचा वापर सुरुवातीला प्रथम मोठ्या रकमेचे पेमेंट आणि सेटलमेंटसाठी केला जाईल. काही निवडक लोकांसाठी हा पथदर्शी प्रकल्प रिझर्व्ह बँकेने सुरू केला आहे. त्यानंतर महिन्याभरानंतर रिझर्व्ह बँक किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल रुपीचा प्रकल्प खुला करणार आहे.

सिबिडिसी रुपी म्हणजे काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक डिजिटल करंसी अर्थात सिबीडीसीची व्याख्या कायदेशीर निविदा लिगल टेंडर इश्यू बाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशी केली आहे. हे डिजिटल चलन फियाट चलनासारखे असणार आहे. ते वन टू वन एक्सचेंज करता येऊ शकणार आहे. सोप्या शब्दांत सीबीडीसी हे राष्ट्रीय चलनासारखे आहे. फक्त हे डिजिटल स्वरूपात असेल. त्यामुळे यात क्रिप्टोकरन्सीसारखी अस्थिरता दिसणार नाही.

थेट आरबीआयशी व्यवहार
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी युजर्सना त्यांची बँक खाती युपीआयशी लिंक करणे आवश्यक आहे. एखाद्याला रकमेचे पेमेंट करताना अथवा मनी ट्रान्सफर करताना सीबीडीसी बँकिंग प्रणालीचा वापर करणार नाही. हे वित्तीय संस्थांऐवजी मध्यवर्ती बँकेवर म्हणजेच, आरबीआयशी थेट व्यवहार करेल.

डिजिटल रुपीचे फायदे

रिझर्व्ह बँकेने त्यासाठी सीबीडीसी- डब्ल्यू आणि सीबीडीसी – आर या दोन श्रेणींमध्ये डिजिटल चलनाची विभागणी केली आहे. सीबीडीसी डब्ल्यू हे घाऊक चलन म्हणून वापरले जाऊ शकते तर सीबीडीसी आर किरकोळ चलन म्हणून वापरले जाईल. सर्व खाजगी, गैर-आर्थिक ग्राहक आणि व्यवसाय ते वापरण्यास सक्षम झाल्यानंतर भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वाढेल.

रोखीमध्ये रुपांतर शक्य
रिझर्व्ह बँकेच्या मते सीबीडीसी हे पेमेंटचे माध्यम असेल. जे सर्व नागरिक, व्यवसाय, सरकार आणि इतरांना कायदेशीर निविदा म्हणून जारी केले जाईल. त्याचे मूल्य सुरक्षित स्टोअरच्या कायदेशीर टेंडर नोट (चालू चलन) च्या बरोबरीचे असेल. वापरकर्ते ते सहजपणे बँक मनी आणि रोख रकमेत रूपांतरित करू शकतील. बिटकॉईन सारख्या इतर आभासी चलनांना काढून टाकून हे डिजिटल चलन बाजारात उत्तम स्थान निर्माण करेल असा विश्वास रिझर्व्ह बँकेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या