22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रडीसीपी पराग मणेरेंची पुन्हा नियुक्ती

डीसीपी पराग मणेरेंची पुन्हा नियुक्ती

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द करण्याचा धडाका लावला आहे. त्यात आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित कथित खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने निलंबित केलेले डीसीपी पराग मणेरे यांना एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, विरोधक या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उद्धव ठाकरे सरकारने परमबीर सिंग यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सेवेतून निलंबित केले होते. यासोबतच खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डीसीपी पराग मणेरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करत त्यांना निलंबित केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या