23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeप्रेक्षकांविना सामने खेळण्यास तयार : नवदीप

प्रेक्षकांविना सामने खेळण्यास तयार : नवदीप

एकमत ऑनलाईन

प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य; क्रीडा रसिकांमध्ये उत्सुकता

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगभरातील क्रीडा स्पर्धा गेल्या दोन महिन्यांपासून बंद होत्या. मात्र अर्थव्यवस्थेला होणारे नुकसान लक्षात घेता, काही क्रीडा स्पर्धांना सरकारने परवानगी दिली आहे. जर्मनीत बुंदेस्लिग स्पर्धा सुरू झालेली आहे. भारतातही केंद्र सरकारने अद्याप स्पर्धांना परवानगी दिली नसली तरीही स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि मैदानं सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. गेले काही महिने फक्त घरात बसून राहिलेल्या भारतीय खेळाडूंसाठी हा दिलासादायक निर्णय आहे. मात्र भविष्यकाळात प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रिकाम्या मैदानांवर सामने खेळण्यास आपली तयारी असल्याचे वक्तव्य भारताचा युवा जलदगती गोलंदाज नवदीप सैनीने व्यक्त केले आहे. तो एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

‘‘भारताचे चाहते हे खूप उत्साही आहेत. भारतात आम्ही कुठेही सामना खेळतो त्यावेळी ते हजारोंच्या संख्येने गर्दी करतात, इतकेच नव्हे तर परदेशातील सामन्यांसाठीही ते हजर असतात. विकेट घेणे असो, कॅच पकडणे, रन-आऊट झाल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन नसेल तर आम्हाला नक्कीच चुकल्यासारखे वाटेल. पण चाहत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर आम्ही प्रेक्षकांविना सामने खेळण्यास तयार आहोत.’’ नवदीपने आपले मत मांडले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. केंद्र सरकारने मैदाने सुरू करण्याची परवानगी दिली असली तरीही प्रवासासाठी बंदी कायम असल्यामुळे बीसीसीआय अजूनही आयपीएलबद्दल ठोस निर्णय घेत नाहीये. दरम्यान जुलै महिन्यात श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही भारताला तिरंगी मालिका खेळण्याचे निमंत्रण दिले आहे. ज्यावर केंद्र सरकारने प्रवासाची परवानगी दिल्यास भारतीय संघ लंकेत खेळायला तयार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले होते.

Read More  जम्मू-काश्मीरमध्ये नवा अधिवास कायदा लागू

सप्टेंबर-नोव्हेंबर मध्ये आयपीएलचं आयोजन?
बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या विचारात आहे. ‘‘सध्या या गोष्टीवर ठामपणे काही सांगणं योग्य होणार नाही, कारण अनेक गोष्टी जुळून येणं गरजेचं आहे. पण होय, बीसीसीआय २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी करत आहे. पण अर्थात यासाठी परिस्थितीमध्ये सुधारणा होणं आणि सरकारची परवानगी मिळणं गरजेचं आहे. पण सप्टेंबर ते नोव्हेंबरचा काळ आयपीएलच्या आयोजनासाठी विचारात आहे हे नक्की ’’ सरकारने या काळात स्पर्धेला मान्यता दिल्यास, मैदानं, खेळाडूंचा प्रवास या सर्व गोष्टींचं नियोजन कसं करायचं याची तयारीही बीसीसीआयने सुरु केली आहे. मात्र या सर्व गोष्टींसाठी देशातली परिस्थिती सुधारणं गरजेचं असल्याचंही बीसीसीआयमधील सूत्रांनी स्पष्ट केलं. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील मैदानं उघण्याची परवानगी दिली होती. मात्र या परिसरात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी मिळणार नाहीये. त्यामुळे आयपीएल आयोजनाबद्दल सरकार नेमकं काय निर्णय घेतलंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रोत्साहन नसेल तर आम्हाला नक्कीच चुकल्यासारखे वाटेल
‘‘भारताचे चाहते हे खूप उत्साही आहेत. भारतात आम्ही कुठेही सामना खेळतो त्यावेळी ते हजारोंच्या संख्येने गर्दी करतात, इतकेच नव्हे तर परदेशातील सामन्यांसाठीही ते हजर असतात. विकेट घेणे असो, कॅच पकडणे, रन-आऊट झाल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन नसेल तर आम्हाला नक्कीच चुकल्यासारखे वाटेल. पण चाहत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर आम्ही प्रेक्षकांविना सामने खेळण्यास तयार आहोत.’’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या