मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील स्थिती चिंताजनक झाली आहे. एकट्या दिल्लीत जुलैपर्यंत साडे पाच लाखांपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पोहोचू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९९८५ नवे रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून २,७६,५८३वर पोहोचली. आतापर्यंत यात तब्बल ७७४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाबाधित लोकांपेक्षा या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसेसची संख्या १३३६३२ इतकी आहे तर उपचारानंतर ठीक झालेल्या लोकांची संख्या १३५२०६ इतकी आहे.
राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अनलॉक १ लागू झाल्यानंतर झपाट्याने वाढले…
देशात अनलॉक १ लागू झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. या आजाराने सर्वात प्रभावित झालेले राज्य महाराष्ट्र होय. मंगळवारपर्यंत रुग्णांची संख्या ९० हजारांच्या पार झाली. मात्र, यापैकी ४० हजारांहून अधिक बाधित हे उपचारानंतर बरे झाले आहेत. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैनने जुलैच्या अखेरपर्यंत राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच लाखापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली आहे. दिल्लीत आता कोरोनाचे ३० हजार रुग्ण आढळले आहेत.
दिल्लीमध्ये स्थिती ठीक नाही; मात्र केंद्र सरकारने हे फेटाळून लावले
जैन यांनी मंगळवारी मीडियाशी बोलताना सांगितले, दिल्लीमध्ये जे रुग्ण समोर येत आहे ते कसे कोरोना बाधित झाले याची माहिती मिळत नाही आहे, लोकांच्या मते दिल्लीमध्ये कोरोनाने तिसरा टप्पा गाठला आहे. मात्र केंद्र सरकारने हे फेटाळून लावले आहे. जगामध्ये या आजारामुळे तब्बल ७२ लाख लोक बाधित झाले आहेत तर चार लाखाहून अधिकांचा मृत्यू झाला आहे.
Read More सुरक्षारक्षकाने ताब्यात घेतले : अनोळखी इसमाचा तुळजाभवानी मंदीरात प्रवेश