23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रबंडखोर आमदारांची राजकीय तिरडी उठणारच

बंडखोर आमदारांची राजकीय तिरडी उठणारच

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेवर मोठे संकट ओढावले आहे. एक-एक करून आमदार-खासदार आणि पदाधिकारी आपला राजीनामा देत आहेत. त्यामुळे शिवसेना सध्या संकटाच्या गर्तेत सापडली आहे. मात्र, पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत शिवसेना वाचवण्यासाठी वारंवार प्रयत्न करताना दिसत आहेत.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार प्रहार केला आहे. संजय राऊत म्हणाले, लोक एकनाथ शिंदे गटासी गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांची राजकीय तिरडी उठणारच, असा कडक इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे. राज्यात सत्याचा खून केला जातोय. महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा पुरावा देईल आणि जनता त्यांची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाळासाहेबांचा आत्मा त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला.

शिवाय, आज पुन्हा राऊतांनी ट्विट करत शिवसैनिकांचा आत्मविश्वासही वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. उर्दू शायर जिगर मुरादाबादी यांची शायरी ट्विट करत संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘जो तुफानों में पलते जा रहे हैं, वहीं दुनिया बदलते जा रहे हैं!’ हे ट्विट राऊत यांनी आदित्य ठाकरे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल यांना हॅशटॅग केले. त्यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हॅशटॅग केले आहे, त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. राऊतांचा नेमका निशाणा कोणावर, याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या