27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईतील कांदिवली परिसरात आढळले ४ मृतदेह

मुंबईतील कांदिवली परिसरात आढळले ४ मृतदेह

एकमत ऑनलाईन

मुंबई – मुंबईच्या कांदिवली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कांदिवलीच्या दळवी हॉस्पिटल परिसरात चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून तीन महिलांची हत्या करून आरोपीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे

. त्यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिवदयाल सेन अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. यातील शिवदयाल सेन याच्या खिशात सुसाईड नोट सापडल्या असून त्यात भूमी यांच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कांदिवली पोलिस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, प्रेमप्रकरणातून तीन महिलांची हत्या करून आरोपीने गळफास घेतला असल्याची घटना कांदिवली येथे घडली आहे. कांदिवलीच्या दळवी हॉस्पिटलच्या परिसरात चार मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिवदयाल सेन यांचे असून प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिकचा तपास कांदिवली पोलिस करत आहेत. या घटनेमुळे कांदिवली परिसरात खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या