16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये भाजप आमदारांचे बंड

गुजरातमध्ये भाजप आमदारांचे बंड

एकमत ऑनलाईन

तिकीट नाकारल्याने अपक्ष उमेदवारी, ७ आमदारांवर कारवाई
गांधीनगर : भाजपने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणा-या ७ नेत्यांना भाजपने शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित केले आहे. या आमदारांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या हवाल्याने स्पष्ट झाले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या भाजप नेत्यांमध्ये नर्मदा जिल्ह्यातील नंदगड येथील हर्षद वसावा यांचा समावेश आहे. जुनागढमधील केशोद जुनागड येथून तिकीट मागणा-या अरविंद लाडानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सुरेंद्रनगरमधील धनगड्रा येथील चित्रसिंह गुंजरिया, वलसाडमधील पराडी येथील केतनभाई पटेल, राजकोट ग्रामीणमधील भरतभाई चावडा, गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथील उदयभाई शहा आणि अमरेलीच्या राजुलातून तिकीट मागणा-या करणभाई बरैया यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

४२ विद्यमान आमदारांना
भाजपने नाकारले तिकीट
गुजरातमध्ये भाजपने ४२ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे. १६० उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा करणा-या भाजपने ३८ विद्यमान आमदारांना तिकीट दिले नाही. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या अनेक दिग्गज नेत्यांना भाजपने डच्चू दिला आहे. २०१७ च्या गुजरात निवडणुकीत भाजपने १८२ पैकी ९९ जागांवर विजय मिळवला होता. मागील २७ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या