27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंसह बंडखोरांकडून आसाममधल्या पूरग्रस्तांना मदत जाहीर

शिंदेंसह बंडखोरांकडून आसाममधल्या पूरग्रस्तांना मदत जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या आठ दिवसांपासून आसाममधल्या गुवाहाटीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे वास्तव्यास आहेत. आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशातच आता पूरग्रस्तांसाठी या आमदारांनी मदत जाहीर केली आहे. शिंदेंनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार आसाममध्ये आहेत. दरम्यान, आजच ते आसाममधून निघणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या