दुपारी घरातून बाहेर पडू नका : 28 मे नंतरच उष्णतेपासून सुटका होऊ शकते
नवी दिल्ली : हवामान खात्याने (आयएमडी) उत्तर भारतातील राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणच्या बर्याच भागात तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर जाऊ शकते. काही ठिकाणी तापमान 47 अंशांपेक्षा जास्त देखील असू शकतं. आयएमडीनं रविवारी दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसाठी पुढील दोन ते तीन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
पुढील दोन ते तीन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी
हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितलं की, विभागानं पूर्व उत्तर प्रदेशातही उष्मघातामुळे ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत काही भागातील तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात प्रथमच उष्मघातामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे.लोकांनी दुपारी ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये म्हणून इशारा देण्यासाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण त्यावेळी उष्णता सर्वाधिक असेल. 28 मे नंतरच उष्णतेपासून सुटका होऊ शकते. कारण पश्चिमी भागातील हवामानाच्या बदलामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Read More 125 ट्रेन्सची यादी कुठे? रेल्वेमंत्र्यांचा मध्यरात्री उद्धव ठाकरेंना प्रश्न
कडक उष्णतेचा तडाखा असणार
येत्या पाच दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये कडक उष्णतेचा तडाखा असणार आहे. छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि उत्तर आतील कर्नाटकातील वेगळ्या भागातही उष्णतेची लाट येऊ शकते. कमाल तापमान किमान 40 डिग्री सेल्सिअस तापमान असतं आणि सामान्य तापमान 4.5 डिग्री सेल्सियसवरून 6.4 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढतं तेव्हा लूची उष्णघाताची स्थिती घोषित केली जाते. मैदानी क्षेत्रांसाठी लूची परिस्थिती उद्भवते जेव्हा जास्तीत जास्त तापमान 45 डिग्री असते आणि तीव्र उष्णता 47 डिग्री किंवा त्याहून अधिक असते.