23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकिंमती कमी करा आणि घरे विका, पियूष गोयल यांचा बांधकाम व्यावसायिकांना सल्ला

किंमती कमी करा आणि घरे विका, पियूष गोयल यांचा बांधकाम व्यावसायिकांना सल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार रेडी रेकनरचे दर कमी करण्याबाबत विचार करेल मात्र बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्याकडे असलेल्या घरांच्या किंमती कमी करून त्या विकायला हव्यात असा सल्ला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी दिला आहे. गोयल यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रमुख बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधला. गोयल म्हणाले की बांधकाम बाजारातील परिस्थिती सुधारेल या भरवशावर न राहाता व्यावसायिकांनी त्यांच्याकडे असलेली घरे विकावीत.

गोयल यांनी बांधकाम व्यावसायिकांशी साधलेल्या संवादात म्हटले की ‘ आम्ही रेडी रेकनर दरात सवलत देण्याबाबत विचार करत आहोत मात्र तसे झाले किंवा नाही तरीही तुम्हाला तुमच्याकडे साठ्यात असलेली घरे विकावी लागणार आहेत. जोपर्यंत तुम्ही दर कमी करून घरं विकत नाही तोपर्यंत तुम्ही साठ्याच्या बंधनात असाल. साठा तसाच ठेवाल, कर्जाचा बोजा वाढत जाईल आणि मग तुमच्या हातातला साठाही जाईल’ सरकारकडून मदत मिळेल, घर खरेदीची परिस्थिती सुधारेल या आशेवर राहू नका असेही गोयल यांनी सांगितले.

Read More  बॉलिवूडचे लोकप्रिय गीतकार अनवर सागर यांचे निधन

या संवादानंतर मुंबई मिरर या वर्तमानपत्राशी बोलताना निरंजन हिरानंदानी म्हणाले की रेडी रेकनर दरात कपात झाल्याशिवाय आम्ही घरांच्या किंमती कमी करू शकत नाही. हिरानंदानी म्हणाले की जर बाजार भावापेक्षा रेडी रेकनरचे दर जास्त असतील तर त्याचा फटका सरकारलाच बसणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना सरकारला रेडी रेकनर दराच्या चार पट जास्त दर द्यावा लागतो. त्यामुळे जर हे दर जास्त असतील तर त्याचा तोटा हा सरकारलाच सहन करावा लागेल.

बांधकाम व्यावसायिकांसोबतच्या संवादादरम्यान गोयल म्हणाले की जर कोणाला वाटत असेल की या परिस्थितीत सरकार अर्थपुरवठा करेल आणि आपण घरे न विकता दीर्घकाळापर्यंत, परिस्थिती सुधारेपर्यंत तग धरी तर त्यांना एवढंच सांगेन की परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये उत्तम उपाय हा साठ्यातील घरे किंमती विकणे हाच आहे असे गोयल यांनी सांगितले. ज्यांनी घरे विकली आहे त्यांचा तोटा कमी झाला किंवा कर्जमुक्त होण्यास मदत झाली असेही गोयल म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या