27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयखाद्य तेलांचा आयात कर घटविला

खाद्य तेलांचा आयात कर घटविला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने त्याचा परिणाम महागाईत वाढण्यावर झाला आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु असल्याने या काळात खाद्य तेलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यापार्श्वभूमीवर जनतेला दिलासा देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारने विविध खाद्य तेलांवरील करांमध्ये कपात केली आहे. यामुळे तेलाच्या किंमतीही कमी होतील, अशी आशा आहे. ११ सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासूनच हा निर्णय लागू होणार आहे.

सरकारच्या निर्णयानुसार, कच्चे पाम, सोयाबिन आणि सूर्यफूल या तेलाच्या आयात शुल्कात २.५ टक्क्यांनी कपात केली आहे. तर रिफाईंड पाम, सोयाबिन आणि सूर्यफूल तेलामध्ये ३२.५ टक्क्यांनी कपात केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या