हैदराबाद: नवरा आणि बायकोमध्ये किरकोळ कारणांवरुन अनेकदा वाद झाल्याचं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र, आता अशी एक घटना समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच मोठा झटका बसला आहे. पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिची चाकू भोसकून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सायकल आणि दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज चालवतो
ही घटना तेलंगाणातील विकाराबाद जिल्ह्यात असलेल्या दौलताबाद परिसरात घडली आहे. येथे एका व्यक्तीने आपली पत्नी आणि सासऱ्याची चाकू भोसकून हत्या केली आहे. आरोपी हा सायकल आणि दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज चालवतो. असे म्हटलं जात आहे की, आरोपीने १३ वर्षांपूर्वी विवाह केला होता आणि त्यांना दोन मुले देखील आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिलेचं पतीसोबत काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. या भांडणानंतर पीडित महिला काही दिवसांपूर्वीच दौलताबाद येथील बालमपेट परिसरात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे राहण्यास आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि त्यावरुन पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते.
Read More ‘गुलाबो सिताबो’ची आज रिलीज होणार : प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली
महिलाचा पती तिला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी आला मात्र
पतीसोबत झालेल्या वादानंतर ही महिला आपल्या आई-वडिलांच्या घरी राहण्यास आली. सोमवारी महिलाचा पती तिला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी आला मात्र, त्या महिलेने घरी परतण्यास नकार दिला. दौलताबाद येथे आपल्या सासरी गेलेल्या आरोपीला पत्नीने घरी परतण्यास नकार दिल्याने तो चांगलाच संतापला. पत्नीने घरी परतण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आणि त्या महिलेमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आरोपीने पत्नीवर चाकू हल्ला केला. हे पाहताच तिचे वडील बचावासाठी धावून आले आणि त्यावेळी आरोपीने त्यांच्यावरही चाकू हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीची पत्नी आणि सासरे या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.