नवी दिल्ली: संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे निमय पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच दरम्यान उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे एका तरुणाने कोरोना टेस्ट करण्यास नकार दिल्याने त्याच्या चुलत भावंडांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
बिजनौर पोलीस दलाचे अधिकारी संजय कुमार यांनी सांगितले की, दिल्लीत राहणारा मंजीत सिंह हा १९ मे रोजी दिल्लीहून बिजनौर येथील मलकपूर या आपल्या गावात आला होता. बिजनौर येथे येताच त्याची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यानंतर मंजीर आपल्या गावात दाखल झाला. गावात आल्यवर त्याचे चुलत भाऊ कपिल आणि मनोज हे त्याला कोरोना टेस्ट करण्यासाठी वांवार सांगत होते. मात्र, मंजीतने टेस्ट करण्यास नकार दिला. गुरूवारी पु्हा एकदा त्यांनी मंजीतला टेस्ट करण्यास सांगितले मात्र त्याने पुन्हा नकार देताच त्यांच्यात वाद सुरू झाला.
Read More देशातील ५ लाख एकरावरील पिकांना टोळधाडींचा धोका!
हा वाद इतका वाढला की, कपिल आणि मनोज यांनी दोघांनी मिळन मंजीतला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मंजीतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मृतक मंजीतचे वडिल यांनी पोलीस ठाण्यात मंजीतच्या चुलत भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंजीतच्या वडिलांनी त्याचा चुलत भाऊ कपिल, मनोज, त्यांची आई पुनिया आणि मनोजची पत्नी डॉली यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिकारी सत्यप्रकाश सिंह यांनी सांगितले की, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाहीये. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी मंजीतला मारहाण केली. या मारहाणीत मंजीत याच्या खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर मंजीतला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलं मात्र, उपचारादरम्यान मंजीतचा मृत्यू झाला.