36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रलग्नास नकार दिल्याने तिच्या घरासमोर स्वतःला घेतलं पेटवून

लग्नास नकार दिल्याने तिच्या घरासमोर स्वतःला घेतलं पेटवून

एकमत ऑनलाईन

शिर्डी :  शिर्डीमध्ये मुलीने लग्नास नकार दिल्याने तरूणाने स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तरूणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

शिर्डीमध्ये घडली असून काल गुरूवारी दुपारी सार्थक बनसोडे या तरूणाने मुलीने लग्नास नकार दिल्याने तिच्या घरासमोर स्वतःला पेटवून घेतलं आहे. या घटनेत सदर मुलीचे वडील आणि तरुणीही जखमी झाली आहे. मागील 5 वर्षांपासून दोघं एकत्र असल्याचं मुलाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. 90 टक्के भाजलेल्या तरूणावर रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु केला. शिर्डीच्या घटनेत संबधित तरुणाच्या फेसबुकवर अकांऊटवरून सुसाईड नोट आणि काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. याचा देखील सायबर सेल तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या