मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेनेतल्या बंडाला त्यांनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले. तर उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, असेही ते म्हणाले. यावरूनच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
आपल्या ट्विटमधून दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, माननीय लोक आधी बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे, वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपूर्ण अयोध्येलाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावा. आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील, सतत आठवण काढू नये.