मुंबई : ५ जी स्पेक्ट्रम लिलावातील सर्व २२ दूरसंचार मंडळांसाठी बोली लावणारा रिलायन्स जिओ १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपली ५ जी मोबाइल सेवा लॉन्च करू शकतो. ५ जी स्पेक्ट्रम मिळालेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांपैकी रिलायन्स जिओ प्रथम ५ जी मोबाइल सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे.
रिलायन्स इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी म्हणाले होते की, संपूर्ण भारतात ५ जी मोबाइल सेवा सुरू केल्याने आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. रिलायन्स जिओ जागतिक दर्जाची परवडणारी ५ जीची सक्षम सेवा देणार आहे. अशा प्रदान करणार आहोत जे शिक्षण, आरोग्य, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील डिजिटल क्रांतीला गती देण्यासाठी काम करतील. रिलायन्स जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जिओ कमीत कमी कालावधीत ५ जी मोबाइल सेवा आणणार आहे.
१ ऑगस्ट रोजी ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रूपयांचा महसूल मिळला आहे. ४० व्या फेरीनंतर ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्या आता संपूर्ण देशभर ५ जीचे जाळे पसरवणार आहेत. सात दिवस हा लिलाव चालला होता.
भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ संपूर्ण देशात ५ जीचे जाळे पसरवणार असून व्होडाफोन-आयडियाकडून काही मोजक्या सर्कलमध्ये लिलावास पसंती देण्यात आली. अदानी डाटाकडून २६ एमएचझेड स्पेक्ट्रममध्ये अधिक रुची घेत नेटवर्कचे जाळे पसरवणार आहेत.