38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeगणेशवाडीच्या पाणी पुरवठ्यास दिलासा

गणेशवाडीच्या पाणी पुरवठ्यास दिलासा

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील गणेशवाडीच्या पाणीपुरवठ्याच्या सार्वजनिक विहिरीत घेतलेल्या आडव्या बोअरला चांगले पाणी लागले आहे. या पाण्यातून ग्रामस्थांची तहान भागणार असून गावचे भूमिपुत्र राजेंद्र महादेव नारायणपुरे यांनी स्वत:च्या पैशातून राबविलेल्या विधायक उपकृमामूळे गावचा पाणी प्रश्न मिटला असून राजेंद्र नारायणपुरे यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

Read More पोल पडल्याने शेतक-यांचा विद्युत पुरवठा खंडित

गेल्या वर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे गणेशवाडी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. गावाला पाणीपुरवठा करणा-या तळ्याशेजारी असलेल्या पाणीपुरवठ्याच्या सार्वजनिक विहिरीचे पाणी आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. नेमकी या अडचणीच्या काळात गावच्या पाणीपुरवठ्यासाठी राजेंद्र नारायणपुरे धावून आले असून त्यांनी स्वखर्चातून विहिरीत आडवे बोअर घेऊन गावची पाणी टंचाई कायमची मिटविली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे येथे राहणारे ईलेक्ट्रीक व्यवसायिक राजेंद्र महादेव नारायणपुरे हे दिड महिन्यापूर्वी गणेशवाडी येथे गावी आले होते. त्यांनी गावातील पाणीटंचाई पाहुन गावाचे आपण काही देणे लागतो़ या सामाजिक भावनेतून गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरु केला मात्र गावाचा कायमस्वरुपी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा चाळीस फूट खोल विहीरीतून सुरू होता. त्यात आडवा बोअर घेण्याची कल्पना सुचली.त्यासाठी त्यांची तीन आडवे बोअर घेतले. त्यात सत्तर फुटावरच तीन इंची पाणी लागल्याने गावाचा कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या उपक्रमामुळे गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. ग्रामपंचायच्या वतीने सरपंच रसिकाबाई भुसे, उपसरपंच वत्सलाबाई नारायणपुरे, ग्रामसेवक जगन्नाथ राऊत, ग्रामपंचाय. सदस्य प्रभाकर साबदे, सचिन छपरावळे, विठ्ठल जावळे, विजयाबाई गाते, मिना गुम्मे व ग्रामस्थांनी राजेंद्र महादेव नारायणपुरे यांचे आभार व्यक्त करुन सत्कार केला. पाण्याची सोय झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.त्यात कोरोनाच्या संचारबंदीत बाहेर निघणे अवघड झाले आहे. त्यात पाण्यासाठी नागरिकांची होणारी फरफट पाहून आपण समाजाचे काही देणे लागतो. त्यात आपल्या गावांतील नागरिकांना पाणीटंचाई भासू नये, या उदात्त हेतुने विहिरीत स्व:खर्चाने  आडवे बोअर घेऊन नागरिकांना पाण्याची सोय करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली असल्याची भावना पाणीदाते राजेंद्र महादेव नारायणपुरे यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या