26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयतालीबानला दहशतवादी यादीतून हटविणार?

तालीबानला दहशतवादी यादीतून हटविणार?

एकमत ऑनलाईन

मास्को : अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीचा रशियाने नुकताच आढावा घेतलाय. मॉस्कोमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तालिबानसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. पुतिन यांनी रशिया तालिबानला दहशतवादी संघटनांच्या यादीमधून हटवण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. संयुक्त राष्ट्रांकडूनही अशापद्धतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता पुतिन यांनी व्यक्त केली. रशियाने हा निर्णय घेतला तर तालिबान सत्तेत आल्यापासूनचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांना मिळालेला सर्वात मोठा दिलासा ठरेल, असे सांगितले जात आहे.

रशियामधील वृत्तसंस्था असणा-या तासने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींसंदर्भातील चर्चेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तालिबानबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिली. अफगाणिस्तानमधील परिस्थिती तालिबान ज्या पद्धतीने हाताळत आहे ते पाहून भविष्यामध्ये तेथील परिस्थिती अधिक सकारात्मक असेल, असे दिसत आहे.

आम्ही अफगाणिस्तानसंदर्भातील निर्णयांमध्ये ऐक्य कायम ठेवतानाच लवकरात लवकर तालिबानला दहशतवादी संघटनाच्या यादीमधून काढण्यासंदर्भातील निर्णयावर विचार करू, असे पुतिन म्हणालेत. २०३६ पर्यंत पुतीन हेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार असल्याने त्यांच्या या वक्तव्याला फार जास्त महत्व असल्याचे मानले जात आहे. २००१ साली अफगाणिस्तानमधील सत्तेतून पायउतार झाल्यानंतर २००३ सालापासून अफगाणिस्तानमधील हा विरोधकांचा गट रशियाच्या दहशतवाद्यांच्या यादीत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या