28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeमहाराष्ट्रतुमचे कंटेनरमधले खोके काढू का?; मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा

तुमचे कंटेनरमधले खोके काढू का?; मुख्यमंत्री शिंदेंचा सूचक इशारा

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : शिंदे गटाचा दोन दिवसांचा गुवाहाटी दौरा आज आटोपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खोक्यांच्या मुद्यावरूनही शिंदेंनी ठाकरेंना थेट आव्हान दिले.
आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले. शिवाय आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार घेतला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

सगळ्यांना समाधान आणि आनंद वाटला. काल आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमचे जंगी स्वागत केले. त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही सोबत होते. जिथे आम्ही थांबलो तिथे मुख्यमंत्रीही आले होते. त्यांनी स्नेहभोजन दिल्याचे शिंदेंनी सांगितले.

खोक्यांच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदारांच्या छोट्या-मोठ्या खोक्यांबद्दल काय बोलता? फ्रिजमधून खोके कुठे गेले, कंटेनरमधले खोके कुणाकडे जाऊ शकतात, हे समोर येईल. काल केसरकर यांनी सूचक विधान केलेले आहेच. आता सगळ्या दुनियेला माहिती होईल, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

उद्धव ठाकरेंनी कालच्या बुलडाण्यातील सभेत शिंदे गटातील आमदारांना रेडे, खोके सरकार… असे संबोधल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर नाव घेता टीका केली. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून ते हे बोलत आहेत. सरकारबद्दल लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे शिंदे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या