26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयप्रसिद्ध उद्योगपती जमशेद इराणी यांचे निधन

प्रसिद्ध उद्योगपती जमशेद इराणी यांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताचे स्टील मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे उद्योगपती जमशेद जे. इराणी यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. टाटा स्टीलने एक निवेदन प्रसिद्ध करत त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. गेल्या जवळपास ४ दशकांपासून ते टाटा स्टीलशी संलग्न होते.

जमशेद इराणी जून २०११ मध्ये टाटा स्टीलच्या संचालक मंडळामधून निवृत्त झाले होते. त्यांनी या ठिकाणी ४३ वर्षे काम केले होते. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. २ जून १९३६ रोजी नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी परदेशात जाऊन पुढील शिक्षण घेतले आणि आपल्या करिअरची सुरुवात ब्रिटिश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनमधून १९६३ साली केली.

त्यानंतर भारतात परतून त्यांनी टाटा स्टील कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी आणि तीन मुलं जुबिन, निलोफर आणि तनाझ असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या