34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeकोरोना प्रतिबंधक लसीसाठी संशोधन सुरु

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी संशोधन सुरु

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंंत्री अमित देशमुख यांची माहिती

एकमत ऑनलाईन

लातूर : मुंबईचे हॉफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीसाठी संशोधन सुरु आहे़ बीसीसी लसीमुळे प्रतिकार शक्ती वाढते़ याच धर्तीवर संशोधन करुन कोरोनाच्या उपचारात त्याचा उपयोग होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्यात आणि लातूर जिल्ह्यात कोविड-१९ ची काय परिस्थिती आहे़ त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोनांसंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, लातूर जिल्ह्यात कोविड-१९ चे एकुण ६१ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत़ निलंगा तालुक्यातील कोराळी येथे नव्याने सापडलेले ६ रुग्ण हे मुंबई येथून आलेले आहेत़ लातूर येथे उपचार घेतलेले दोन रुग्ण त्यातील एक वडवळ नागनाथ येथील तर दुसरा ठाणे येथून आलेला आहे़ उदगीर येथे कोविड-१९ चा उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या २१ आहे. यात बोरतळतांडा येथील १० रुग्णांचा समावेश् आहे़ मुंबई येथून ९ व हैदराबाद येथून आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे़ या पैकी अनेकजण उपचार घेवून बरे झाले आहेत़ दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला आहे़ विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातील ६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकही स्थानिक नाही ही समाधानाची बाब आहे.

परजिल्ह्यातील लातूरच्या स्थानिकांना स्वगृही परतण्याची परवानगी मिळाली़ अनेकजण परतले आहेत़ तपासणी नियमितपणे सुरु आहे़ कोविड-१९ च्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याची तक्रार नाही़ उदगीर, वडवळ, निलंग्यात आढळलेले रुग्ण परजिल्ह्यातून आले आहेत़ त्यांना विलगीकरण करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात परदेशातून १२६ जण आलेले आहेत़ त्या सर्वांची तपासणी निगेटिव्ह आली आहे़ आज आपण लॉकडाऊन-४ मध्ये आहोत़ उपचार यंत्रणा सुसज्ज आहे़ सुसज्ज रुग्णालयाबरोबरच अद्ययावत प्रयोगशााळाही कार्यान्वीत करण्यात आल्याने केवळ ४ तासांत १६० नमुन्यांची तपासणी केली जात आहे़ त्यामुळे काळजीचे कारण नाही, मात्र दक्षता घ्यावी लागले़ कोविड-१९ पुर्वी राज्यात केवळ ४ लॅब होत्या आज जवळपास ८० लॅब कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत़
लॉकडाऊन-४ मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र गतीमान करण्याचा प्रयत्न आहे़ त्या दृष्टीने बाजार समितीत्या सुरु करण्यात आल्या आहेत़ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले़ हमीभाव दिला जात आहे.

शेती संबंधी उद्योग, व्यवसाय सुरु केले आहेत़ त्यासोबतच काळाबाजार करणा-यांवर कठोर कारवाई, पाणीटंचाई उपाययोजना व रोजगार हमी योजनेची कामे सुरु करणे, एमआयडीसीतील उद्योग सूरु करणे, बांधकामे सुरु करणे, खाजगी हॉस्पिटल्स सुरु करणे, २४ तास सरंपच व लोकप्रतिनिधींशी संपर्क, संवाद त्यामुळे अडचणीची माहिती मिळताच काही क्षणात मदत पोहचते, असेही ते म्हणाले़ यावेळी माजी आमदार वैजनाथराव श्ािंदे, बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, विलासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, अ‍ॅड़ समद पटेल, अभय साळूंके यांची उपस्थिती होती़

२०२० हे वर्ष सावध राहण्याचं
सन २०१९ -२० हे वर्ष सावधानतेचे वर्ष आहे. यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करणे, हात वेळोवेळी धुणे, सामाजिक अंतर पाळणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, विलगीकरन व आलगीकरनातील व्यक्तींनी नियमांचे पालन करावे, अन्य जिल्ह्यातून विना परवानगी लातूर जिल्ह्यात कुणी येणार नाही अथवा बाहेर जाणार नाही याकडे लक्ष ठेवावे, रीतसर परवानगी घेऊन लातूर मध्ये येणारÞ्या पर जिल्ह्यातील किवा पर राज्यातील नागरिकांनी थेट घरी न जाता प्रथम शासकीय रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी व वैद्यकीय अधिकारÞ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
कोविड-१९ वर जोपर्यंत लस निघत नाही तोपर्यंत काही गोष्टी अंगवळणी लागाव्या लागतीलÞ खरे तर कोविड-१९ विरोधी लढा हा रुग्णालया बाहेर सुरु आहेÞ. कोविड-१९ ची लागण बाहेरच होतेÞ. त्यामुळे रुग्णालयावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घेत रुग्णालयाबाहेरील कोविडचा लढा यशस्वी करु, अशा विश्वास अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

कोविड-१९ रुग्णालयाबाहेरील लढा यशस्वी होईल
हे वर्ष सावधानतेचे वर्ष आहे़ फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, तोंडाला, डोळ्यांना हातांचा अनावश्यक स्पर्श टाळणे आदी गोष्टी करणे आवश्यक आहे. कोविड-१९ वर जोपर्यंत लस निघत नाही तोपर्यंत काही गोष्टी अंगवळणी लागाव्या लागतील़ खरे तर कोविड-१९ विरोधी लढा हा रुग्णालया बाहेर सुरु आहे़ कोविड-१९ ची लागण बाहेरच होते़ त्यामुळे रुग्णालयावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घेत रुग्णालयाबाहेरील कोविडचा लढा यशस्वी करु, अशा विश्वास अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.

तज्ज्ञांच्या प्रोटोकॉलनूसार उपचार
४ कोविड-१९ वर अद्याप लस निघालेली नाही़ मग कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांवर कसले उपचार केले जात आहेत?, या संदर्भाने वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर रुग्णालयात केल्या जाणाºया उपचाराचा प्रोटोकॉल वैद्यकीय अभयासकांनी, तज्ज्ञांनी ठरवून दिला आहे़ त्या उपचाराने रुग्णामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढते़ परंतु, एखाद्या रुग्णाला इतर आजार असतील आणि त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर दुर्दैवाने त्या रुग्णाचा मृत्यू होतो, असेही अमित देशमुख म्हणाले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र गतीमान करण्याचा प्रयत्न
लॉकडाऊन-४ मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र गतीमान करण्याचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने बाजार समितीत्या सुरु करण्यात आल्या आहेत. हमीभाव केंद्र, कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेÞ आहेÞत. शेती संबंधी उद्योग, व्यवसाय सुरु केले आहेतÞ, त्यासोबतच काळाबाजार करणारÞ्­यांवर कठोर कारवाई, पाणीटंचाई उपाययोजना व रोजगार हमी योजनेची कामे सुरु करणे, एमआयडीसीतील उद्योग सूरु करणे, बांधकामे सुरु करणे, खाजगी हॉस्पिटल्स सुरु करणे, २४ तास सरंपच व लोकप्रतिनिधींशी संपर्क, संवाद त्यामुळे अडचणीची माहिती मिळताच काही क्षणात मदत पोहचते, असेही पालकमंत्री देशमुख म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या