26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाहाँगकाँगवर दणदणीत विजय, भारत सुपर-४ मध्ये

हाँगकाँगवर दणदणीत विजय, भारत सुपर-४ मध्ये

एकमत ऑनलाईन

दुबई : भारतीय संघाने हाँगकाँगवर दणदणीत विजय साकारला. भारताचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय होता. या विजयासह भारताने आशिया चषकातील सुपर फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारताने हाँगकाँगपुढे विजयासाठी १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण हाँगकाँगला हे आव्हान पेलवले नाही आणि भारताने ४० धावांनी दिमाखदार विजय साकारला. त्यामुळे टीम इंडिया सुपर-४ मध्ये दाखल झाली आहे. पण आजच्या सामन्यात गोलंदाजी चिंतेचा विषय ठरला.

भारताने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली आणि त्यामुळे भारताला हा विजय मिळवता आला. भारताने सुरुवातीपासूनच त्यांच्या धावगतीवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. अर्शदीपने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अर्शदीपच्या गोलंदाजीवरच रवींद्र जडेजाने अचूक थ्रो करत फलंदाजाला रनआऊट केले. त्यानंतर बाबर हयात आणि किचिंत शहा यांनी काही काळ भारताच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. पण त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे भारताचा विजय सुकर झाला.

प्रथम फलंदजाी करताना भारतीय फलंदाजात सूर्यकुमार यादवने सर्वांची मने जिंकली. विराट कोहलीने या सामन्यात अर्धशतक झळकावले खरे, पण सूयकुमारने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाची भूमिका बजावली. विराटपेक्षा सूर्यकुमार यादव जास्त आक्रमकपणे खेळला. सूर्यकुमार २६ चेंडूंत नाबाद ६८ धावांची खेळी साकारली, तर कोहलीने ४४ चेंडूंत ५९ धावा केल्या. त्यामुळे भारताला हाँगकाँगला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान देता आले.

सूर्यकुमारने सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. कोहली शांतपणे फलंदाजी करत असला तरी सूर्याने मात्र धमाकेदार फटकेबाजी करत भारताचा रनरेट चांगलाच वाढवला. सूर्यकुमारच्या फटकेबाजीने सामन्यात चांगले रंग भरले. पण राहुलनंतर कोहलीही थोडी सावध फलंदाजी करत असल्याने थोडा ट्रोल झाला. पण सूर्याने चाहत्यांची मने जिंकली. चौथ्या स्थानावर येत सूर्याने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर संघाला गरज असताना त्याने धावसंख्येचा गिअर बदलल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने ४० व्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्या आणि विराटने दमदार फलंदाजी करीत भारताला १९२ धावांचा पल्ला गाठून दिला.

१९४ दिवसांनंतर विराटचे अर्धशतक
फेब्रुवारीनंतर कोहलीने हे पहिले अर्धशतक झळकावले. त्याने १९४ दिवसांनंतर ही कामगिरी केली. विराटने या अगोदर १८ फेब्रवारी २०२२ रोजी वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्यात आपले शेवटचे अर्धशतक ठोकले होते. एवढ्या दिवसांनी त्याने अर्धशतकाचा दुष्काळ संपवला.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या