27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकाश्मीरी पंडितांची जबाबदारी घेणारे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते

काश्मीरी पंडितांची जबाबदारी घेणारे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काश्मीर खो-यात एका बँक कर्मचा-याच्या हत्येवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्यांना काश्मिरी पंडितांचे रक्षण करायचे आहे त्यांच्याकडे चित्रपटाच्या प्रमोशनमुळे वेळ नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपने काश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनविले असल्याचेही म्हटले आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्वीट केले आहे. गांधींनी ट्विट केले आहे की, बँक व्यवस्थापक, शिक्षक आणि अनेक निष्पाप लोक रोज मारले जात आहेत, काश्मिरी पंडित स्थलांतर करत आहेत. ज्यांना त्यांचे संरक्षण करायचे आहे, त्यांच्याकडे चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ नाही. भाजपने केवळ काश्मीरला आपल्या सत्तेची शिडी बनवली आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने पावले उचला असे आवाहन देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केले आहे.

दरम्यान, गांधींनी या ट्वीटच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरदेखील अप्रत्यक्ष निशाना साधला आहे. कारण शाह यांनी बुधवारी येथील एका विशेष स्क्रिनिंगमध्ये अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज चित्रपट पाहिला होता. खो-यातील वाढत्या काश्मीरी पंिडतांच्या हत्यांनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुवारी (ता. २) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांबाबत चर्चा केली. शुक्रवारी (ता. ३) होणा-या बैठकीत जम्मू आणि काश्मीरच्या एकूण आढावा दरम्यान गृहमंत्री अमित शाह नागरी आणि पोलिस प्रशासनाला ठोस निर्देश देतील अशी चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या