25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयनिवृत्तांना देशात काहीच किंमत नाही

निवृत्तांना देशात काहीच किंमत नाही

एकमत ऑनलाईन

सरन्यायाधीश रमणांनी व्यक्त केली खंत
नवी दिल्ली : देशातील अनेक संवेदनशील मुद्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आपल्या भाषणातून रोखठोक भूमिका मांडत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा भावनांना वाट मोकळी करून दिली. या देशात जो निवृत्त झाला किंवा जो निवृत्त होणार आहे, त्याला या देशात काहीच किंमत नसल्याचे रमणा यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची १७ फेब्रुवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली होती. त्यांनी देशाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ गेल्यावर्षी म्हणजेच २४ एप्रिल २०२१ रोजी घेतली होती. त्यांचा कार्यकाल अजून २ दिवस आहे. काल त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची घोषणा केली होती. गुरुवारी या प्रकरणी आता घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. शुक्रवारी ते सेवानिवृत्त होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आज राजकीय पक्षांकडून होणा-या मोफतच्या घोषणांवरून सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी निवृत्तीवरून हे भाष्य केले. सुनावणीदरम्यान सिनिअर अ‍ॅडव्होकेट विकास सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती असावी, असे मत मांडले. त्याचवेळी त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोधा यांचे नाव या प्रकरणात सुचवले. याला प्रतिवाद करताना सरन्यायाधीश म्हणाले की, या देशात जो निवृत्त झाला आहे किंवा निवृत्त होत आहे, त्याला कोणतीही किंमत या देशात नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या