31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeपरभणीमहसूल विभागातील अधिकारी ०३ एप्रिल पासून जाणार बेमुदत संपावर

महसूल विभागातील अधिकारी ०३ एप्रिल पासून जाणार बेमुदत संपावर

एकमत ऑनलाईन

मानवत : महसूल विभागातील नायब तहसीलदार हे महत्त्वाचे कार्यकारी पद असून हे पद राजपत्रित वर्ग ०२चे पद आहे. परंतू या पदाला राजपत्रित वर्ग ०२च्या पदा इतके वेतन नसल्याने दि.०३ एप्रिल पासून राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

या बाबत वारंवार शासनाकडे ग्रेड पे वाढी संबंधात पाठपुरावा करण्यात आला. परंतू त्याला यश आले नाही. तसेच बक्षी समितीने दिलेल्या अहवालात सुद्धा नायब तहसीलदार या पदाचा ग्रेड पे वाढवून देण्यात आलेला नाही. इतर राजपत्रित गट- ब संवर्गाचा ग्रेड पे मात्र नायब तहसीलदार या पदापेक्षा जास्त आहे.

नायब तहसीलदार हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने व पदोन्नतीने भरल्या जाते. परंतू इतर राजपत्रित गट- ब संवगार्चा ग्रेड पे मात्र नायब तहसीलदार या पदापेक्षा जास्त आहे. कक्ष अधिकारी मंत्रालय यांचा ग्रेड पे रू.४८००, उपशिक्षणाधिकारी म.शी.से. गट-ब ग्रेड पे रू.४८००, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब ग्रेड पे रू.४६००, लेखाधिकारी गट -ब ग्रेड पे रू.४६००, मुख्याधिकारी गट-ब ग्रेड पे रू.४४००, उपअधीक्षक भूमी अभिलेख ग्रेड पे रू.४४०० हे ग्रेड पे असून नायब तहसीलदार या पदाचा ग्रेड पे मात्र रू.४३००आहे.

नायब तहसीलदार हे महसूल खात्यातील महत्त्वाचे पद असून या पदाच्या ग्रेड पे मध्ये वाढी संदर्भात दुर्लक्ष केल्यामुळे महसूल विभागात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे दि.०३ एप्रिल पासून सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार संपावर जात असल्याने महसूल विभागाचे काम ठप्प पडणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या