22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रयेत्या आठवडाभरात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार

येत्या आठवडाभरात रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार

एकमत ऑनलाईन

मुंबई: पुण्यात रिक्षाचा प्रवास महागल्यानंतर आता मुंबईतही रिक्षा- आणि टॅक्सीची भाडेवाढ अटळ मानली जात आहे. येत्या आठवडाभरात यासंबंधीचा निर्णय जाहीर होऊ शकतो. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास ३ ते पाच रुपयांनी महाग होईल, असा अंदाज आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून यासंदर्भात मुंबई मेट्रोपोलिअन रिजन ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीसमोर प्रस्ताव मांडला जाईल. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणा-यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

रिक्षा संघटनांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठवडाभरात या प्रस्तावाला मंजुरी मिळेल. रिक्षाचे किमान भाडे सध्या २१ रुपये इतके आहे. भाडेवाढ झाल्यास किमान भाडे २४ रुपये इतके होईल. तर टॅक्सीच्या भाड्यात ४ ते ५ रुपयांची वाढ होईल. या भाडेवाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजीच्या दरात झालेली वाढ. गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजीचा प्रतिकिलो दर ४९.४० रुपयांवरून ८० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडेवाढीची मागणी करत आहे. यापूर्वी मार्च २०२१ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली होती.

पुण्यात रिक्षांच्या भाड्यात वाढ
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुण्यात रिक्षाच्या भाडेवाढीचा महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी नागरिकांना आता २५ आणि नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रूपये मोजावे लागणार आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून सीएनजीचा दर वाढतच आहे. या परिस्थितीमुळे रिक्षाचालक आणि मालकांमध्ये संताप पाहायला मिळत होता. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालकांच्या उत्पनातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता घर चालवायचे कसे असा प्रश्न रिक्षाचालकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या