26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्ररिपाइंचे कार्यकर्ते शिंदेंच्या पाठिशी

रिपाइंचे कार्यकर्ते शिंदेंच्या पाठिशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसैनिकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. शिंदेंना काही झाले तर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, असे वक्तव्य करत बंडखोर शिंदेंच्या भूमिकेला रामदास आठवले यांनी समर्थन दर्शवले आहे.
रामदास आठवले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यादरम्यान, दोघांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती आठवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली. चर्चेदरम्यान, एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद हा अंतर्गत आहे.

त्यांच्या पक्षातील ही वैयक्तिक बाब असून भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे फडणवीस यांनी सांगितले असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्वत: आपापसांतील वाद मिटवतील, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही वाट पाहत आहोत. असेही फडणवीस यांनी म्हटले असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

विधानसभेचे आमदार हे शिंदेंसोबत आहेत. हे सरकार अल्पमतामध्ये आहे. त्यामुळे हे सरकार कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. तसेच पक्षातून काढून टाकणे ठीक आहे पण आमदारकी रद्द करण्याची मागणी चुकीची आहे. गेलेले आमदार तुमच्याकडे परत येतील याची शक्यता कमी आहे.

तसेच, आम्ही सरकार स्थापनेचा विचार केलेला नाही. येणा-या काळात काय होते ते पाहू. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बहुमत दाखवू, असे म्हणत आहेत. अनेक आमदार तुम्हाला सोडून गेले- शिवसेनेचे ३७ आणि ७-८ अपक्ष- असे कसे म्हणता येईल? असा सवाल आठवले यांनी यावेळी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या