कोलंबो : श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशात हिंसाचार उडाला आहे. आतापर्यंत या हिंसाचारात जवळपास २०० जण जखमी झाले असून एका खासदाराचाही मृत्यू झाला आहे. अशातच
माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेलिकॉप्टरमधून नौदल तळावर हलवण्यात आले आहे. श्रीलंकेतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
राजपक्षे यांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये चकमकी सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे सोमवारी श्रीलंकेतील हंबनटोटा येथे संतप्त आंदोलकांनी महिंदा राजपक्षे यांच्या घराला आग लावली होती. हिंसाचारात जवळपास एका खासदाराचा मृत्यू झाला आहे. श्रीलंकेतील तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. श्रीलंकेतील सगळ्याच राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
विरोधी पक्षाचा सरकार स्थापनेचा प्रस्ताव
श्रीलंकेतील मुख्य विरोधी पक्ष समगी जना बालावेगया यांनी श्रीलंकेत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, राष्ट्रपतींनी तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर विरोधकांनी राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.