27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमनोरंजनरियाने अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतला दिला

रियाने अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतला दिला

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की, सुशांतसिंह राजपूतची गलफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करून त्याला दिला. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली. ३५ आरोपींविरोधात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आपला भाऊ शौविक आणि अन्य आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी केला आणि सुशांतसिंह राजपूतला दिला होता. एनसीबीने दावा केला आहे की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सगळ्या आरोपींनी एकमेकांसोबत मार्च २०२० पासून डिसेंबर २०२० पर्यंत कारस्थान रचले होते, जेणेकरून ते बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्जचे वाटप आणि खरेदी-विक्री करू शकतील.

आरोपींनी मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीला वित्तपुरवठा केला, तसेच गांजा, चरस, कोकेनसारख्या अमली पदार्थांचा वापरही केला. यासाठी सर्व आरोपींच्या विरोधात कलम २७ आणि २७ ए, २८ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे आरोप निश्चित करण्याआधी न्यायालय सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यासाठीच्या याचिकेवर विचार करेल. एनडीआरएस अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी या प्रकरणातल्या सुनावणीसाठी २७ जुलै ही तारीख दिली आहे. आता पुढची सुनावणी १५ दिवसांनंतर होईल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या