32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeउस्मानाबादकुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर 'डल्ला', जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश !

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर ‘डल्ला’, जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश !

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याची गंभीर दखल घेत तत्कालीन धार्मिक व्यवस्थपकासह अन्य दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश दिले आहेत.

दागिने गायब झाल्या प्रकरणी हा पहिलाच गुन्हा दाखल होणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे आदेश दिले आहेत. पोलिसात गुन्हे नोंद करण्यासाठी तुळजापूर तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे व्यवयस्थापकांना प्राधिकृत केले असून तत्कालीन धार्मिक सह व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. देवीच्या खजिन्यातील तब्बल 71 प्राचीन नाण्यांसह अनेक दागिने गायब आहेत.

आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील 71 ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती.

तुळजाभवानी मातेला निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर, उदयपूर, लखनो, बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवीच्या चारणी अर्पण केली होती. या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू व मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. गंगणे यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती. त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते.

प्रशासकीय पत्रव्यवहार व लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या या प्रकरणात नूतन जिल्हाधिकारी तथा मंदिर समिती अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी लक्ष घालून गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. तुळजाभवानी देवीला अनेक राजे महाराजे यांनी सोने चांदी दागिन्यासह नाणी अर्पण केली होती त्याची नोंद मंदिर संस्थांच्या वहीत होती मात्र पदभार स्वीकारताना व देताना अनेक मौल्यवान वस्तू व दागिने गायब करून त्याचा काळाबाजार करण्यात आल्याचे चौकशी समितीत सिद्ध झाले आहे. देवीच्या खजिन्यातील शिवकालीन नाण्यासह इतर संस्थानची नाणी वस्तूवर डल्ला मारला असुन यात मंदिर संस्थांनचे काही अधिकारी घरचे भेदी निघाले आहेत. या घोटाळ्यातील गुन्ह्यात सहभागी अधिकारी यांची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसते.

राफेल लढाऊ विमान हवाई दलाच्या ताफ्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या