27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeरोहितला बनला टी-२० चा उत्कृष्ट खेळाडू

रोहितला बनला टी-२० चा उत्कृष्ट खेळाडू

एकमत ऑनलाईन

मुंबई : चाहत्यांनी रोहित शर्माची टी-२०चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली. क्रिकइन्फोद्वारे आयोजित सर्वेक्षणात ९४,१८४ मते मिळाली. रोहितला ५९.३३ टक्के आणि आंद्रे रसेलला ४०.६७ टक्के मते मिळाली.

Read More  चीन-भारत सीमावाद : भारताच्या बाजूने उभी राहणार अमेरिका

यापूर्वी रोहितने जसप्रीत बुमरा, सुनील नरेन, एबी डीव्हिलर्स आणि गेलपेक्षा अधिक मते मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे, तज्ज्ञांनी ख्रिस गेलला टी-२० क्रिकेटचा सर्वांत महान खेळाडू म्हणून निवडले. ३२ खेळाडूंच्या यादीतून तज्ज्ञांनी रोहित शर्माला पहिल्याच फेरीतून बाहेर केले होते.

त्यांनी बुमराला रोहितपेक्षा चांगला टी-२० खेळाडू म्हणून पसंती दिली होती. उपान्त्य फेरीत रोहित विरुद्ध गेलला केवळ १३.९६ टक्के मते मिळाली. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या